महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी- डॉ.माणिक गुर्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 24, 2024

महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी- डॉ.माणिक गुर्रम

 महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी- डॉ.माणिक गुर्रम

कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या स्मृतीस महिला संघटनेकडून विनम्र अभिवादन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आझाद हिंद सेनेच्या सैन्यात पुरुषांच्या बरोबरीने अग्रभागी राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना अभिवादन करताना आजच्या सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा कारण त्या आयोग्याच्या दृष्टीने खूप मजबूत होत्या. म्हणून त्या देशसेवेत  स्वतःला वाहून घेतल्या.त्यासाठी आपण ही आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहार,विहार,पुरेसा व्यायाम आणि नेहमी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. असे मत डॉ.माणिक गुर्रम  यांनी व्यक्त केले.

मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना  आणि  श्री.मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन कॉ.लक्ष्मी सेहगल यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली
 दत्त नगर येथील लालबावटा मुख्य कार्यालय येथे मोफत महिलांची आरोग्य तपासणी व औषोपचार शिबिर पार पडले. या शिबिरास एम.एस.एम. आर.आय.कडून मोफत औषधे उपलब्ध करून दिले.त्यांचे संघटनेच्या वतीने विशेष आभार मानले.

या शिबिराची सुरुवात कॅप्टन कॉ.लक्ष्मी सहगल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर,सिटूचे राज्य सचिव ॲड. एम.एच.शेख,अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे राज्य अध्यक्ष  कॉ.नसीमा शेख, जिल्हा अध्यक्षा शेवंताताई देशमुख, जिल्हा सचिवा शकुंतला पाणीभाते,लिंगव्वा सोलापूरे हे  शाम आडम आदींची उपस्थिती होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ.राजशेखर स्वामी,डॉ.भीमन्ना बदेली,डॉ.मनीषा पाटील, डॉ.तृप्ती कडपा,डॉ.ऋषिकेश देवरे, डॉ.उमरफारूक सय्यद,
पांडुरंग रच्चा,रजनी कोंडा आदींचा समावेश होता.

यावेळी परिसरातील अनेक महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला.यावेळी तपासणी सोबत गोळ्या व औषधे ही मोफत देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages