सवतगव्हाण येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

सवतगव्हाण येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

 सवतगव्हाण येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

माळीनगर (कटूसत्य वृत्त):- मौजे सवतगव्हाण येथे गुरुपौर्णिमेनिमित्त, गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायतीचे युवा उपसरपंच यशराज नितीनराजे निंबाळकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आला. यानिमित्ताने कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजित बापू निंबाळकर यांनी करून गावातील मरिआईलक्ष्मी मंदिराचे नविन बांधकाम व गावातील विकास कामाविषयी माहिती दिली. तसेच लोकनेते कै. रावसाहेब निंबाळकर यांच्या संकल्पनेतील नियोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकामाबाबत गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनेबद्दल गावचे उपसरपंच यशराज निंबाळकर यांनी यासंबंधी लोकसहभागातून चालू वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कामकाज चालू करण्या संदर्भात उपस्थित ज्येष्ठ नागरीकांना ग्वाही दिली व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी व सेवेसाठी तत्पर राहणेबाबत शब्द दिला. कार्यक्रमास उपस्थित माजी उपसभापती सुभाषराव निंबाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष हमीद शेख,उमेश जाधव, करण इनामके,वैभव जाधव ज्येष्ठ नागरिक अब्बासभाई तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमानिमित्त सवतगव्हाणचे माजी सरपंच व माळशिरस तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर,रामचंद्र निंबाळकर, सहकार महर्षीचे संचालक विराजसिंह निंबाळकर,माजी उपसरपंच अविनाश जाधव, दादासाहेब लवटे, श्रीनिवास जाधव, गजेंद्र शिंदे-पाटील, अमोल बोरावके यांनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले व शेवटी अविनाश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages