त्या गरोदर मातेला पुला च्या पाण्यातुन खाटेच्या आधारे काढले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 22, 2024

त्या गरोदर मातेला पुला च्या पाण्यातुन खाटेच्या आधारे काढले

 त्या गरोदर मातेला पुला च्या पाण्यातुन खाटेच्या आधारे काढले

सिंदेवाही (कटूसत्यवृत्त):-सिंदेवाही तालुक्यात सतत पावसामुळे व धरणाचे पाणी विसर्जन केल्यामुळे तालुक्यात पुर परिस्थितीत निर्माण झाली आहे. विविध पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पंधरा गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. व शंभर पेक्षा जास्ती घंरांंची पळझळ झाली आहे. काल सिंदेवाही तालुक्यातील कुकळहेटी या गावातील गरोदर मातेला या पुर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अंगावर काटा आणणारी काल परिस्थिती बघायला आली आहे. त्या गरोदर मातेच्या वेदना असहाय झाल्याने व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने शेवटी पुलाच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने तिला काढण्यात आले.  त्या गरोदर मातेच्या असहाय्य वेदना माणसाच्या काळजावर घाव घालणारी होती म्हणून नातेवाईक व गावकऱ्यांनी स्वताच्या जिवाची चिंता न करता मदत केली. दहा किलोमीटरवर चा प्रवासासाठी तब्बल आठ तास लागलेत. अथक प्रयत्नानंतर सिंदेवाही ग्रामिण रूग्णालय दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अतिशय चिंताजनक व गंभीर असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी हलवने आवश्यक होते मात्र सिंदेवाही वरून चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर चे संपूर्ण रस्ते बंद होती. शेवटी रात्री नवु वाजताच्या सुमारास नागपूर चालू झाल्याने नागपुर ला हलविण्यात आले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages