Hot Posts

6/recent/ticker-posts

पद्मशाली शिक्षण संस्थेवर दशरथ गोप यांची सत्ता अबाधित

 पद्मशाली शिक्षण संस्थेवर  दशरथ गोप यांची सत्ता अबाधित

सत्ताधारी उत्कर्ष पॅनल चे सर्व उमेदवार विजयी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एकहाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप  हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहे. रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व 25 उमेदवार विजयी झाले.

 मंडळाच्या 25 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते.  सत्ताधार्‍यांविरोधात केवळ सहा उमेदवार होते. त्यापैकी तीन जणांनी सत्ताधारी पॅनलला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फीच ठरली होती.  अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलने निर्विवाद यश संपादन केले. 

रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत कुचन प्रशालेतील चार केंद्रांवर मतदान झाले. मतदानानंतर लगेचच संस्थेच्या इप्पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. पी. कदम यांनी दिली.

या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांना 606 मते पडली. विजय झालेल्या अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.

 प्रा.श्रीनिवास कोंडी (615), नागनाथ गंजी (604), दिनेश यन्नम ( 597), विजय गुल्लापल्ली (601), श्रीधर चिट्याल (599),अशोक चिलका (603), संगीता इंदापुरे (606), व्यंकटेश आकेन (601), पांडुरंग दिड्डी ( 604), मल्लिकार्जुन सरगम (577), रमेश बोध्दूल (599),प्रभाकर अरकाल ( 601), श्रीनिवास क्यातम (613), गोवर्धन कमटम (612), श्रीनिवास गड्डम (598), रामदास इप्पाकायल (602),  दत्तात्रय यन्नम (587),  नागनाथ श्रीरामदास (577), मधुकर कट्टा (604),  हरिश कोंडा (596), गणेश गुज्जा (601), नरेश श्रीराम (595), श्रीनिवास जोग (586), अंबादास गज्जम (594) विरोधी गटातील अजय अन्नलदास, दयानंद कोंडाबत्तीनी, बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना काही मते मिळाली. अन्नलदास यांना 40, कोंडाबत्तीनी यांना 36, जक्का  यांना 31 मते पडली. अन्य उमेदवार उमेश आडम यांना 90, गोवर्धन बोडा यांना 35 आणि नागबाबू कुडक्याल यांना 47 मते पडली.

एका राजकीय नेत्यामुळे निवडणूक लागली : गोप

ही निवडणूक बिनविरोध होणार होती, मात्र एका राजकीय नेत्याने आडकाठी आणून काही लोकांना उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यास सांगितले. त्यामुळे ही निवडणूक लागली, असा आरोप पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना केला.   पद्मशाली समाजात एकी होऊ नये म्हणून या राजकीय नेत्याने ही खेळी खेळली. वेळ आल्यावर त्यांचे नाव उघड करू, असेही गोप यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments