स्मृतीगंध मैत्रीचा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 4, 2024

स्मृतीगंध मैत्रीचा

 स्मृतीगंध मैत्रीचा 

1985 साली आम्ही सर्वजणी एकत्र विद्यामंदिर हायस्कूल. वैराग जि - सोलापूर येथे. १० वी पर्यंत शिकत होतो. त्यानंतर माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळे गाव सोडावे लागले पण बालमैत्रिणीची आठवण मात्र गेलीच नाही. काहीजणीची लवकरच लग्न झाली काहीजणी पुढे शिक्षण घेऊ लागल्या होत्या. पण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फोन सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तीव्र इच्छा असूनही बोलू शकत नव्हतो. नंतरखूप मैत्रीणी आयुष्यात आल्या पण बालमैत्रिणीची उणीव मात्र मला सतत जाणवत होती. लग्न होऊन मुंबईसारख्याशहरात नोकरी करू लागले. धावपळीचे जीवन तर पाचवीलाच पुजलेले. पण त्यातूनही कधी कधी बालमैत्रीणीची आठवण आली की मन उदास होत. मग मात्र शोध घ्यायचाच अस पक्के ठरवले. आणि अथक प्रयासातून एक- एकीचा शोध लागला मग एक व्हाँट्सग्रुप बनला. मग मात्र एकमेकींना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. आणि पुण्यापासून 25 कि.मी अंतरावर असलेल्या अंजनवेल कृषी पर्यटन येथे सर्वांनी भेटायचे ठरविले औरंगाबाद, मालवण कोल्हापूर, सोलापूर वैराग, पुणे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून आम्ही एकत्र जमलो. मग मात्र आनंदाला पारावर राहिला नाही. सगळ्या वयाच्या 52 / 53 व्या वर्षी भेटत होतो १४ वर्षी मात्र व्या वर्षी एकमेकीपासून दूर झालेलो आम्ही सख्या जेव्हा भेटलो तेव्हा. कोणाचाही चेहरा ओळखायला आला नाही, पण एकमेंकीच्या गळा पडून गळाभेटी झाल्या. हातात आलेले हात त्यांच्या मुठी आवळल्या गेल्या. आणि एवढा आनंद झाला की त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत तहान भूक हरवून नुसत्या गप्पा आणि गप्पा.

लहानपणीच्याआठवणींना उजाळा. कोणालाही वयाच भानच राहिले नाही .नुसत्या गप्पा, मज्जा, सगळ्यांच्या टोपणनावांनी आणखीच जवळ आलो. प्रत्येकीने आतापर्यंत आपण कुठे, कसे, जीवन व्यतित केले तेही सांगितले . करोनाच्या रौद्र रूपाने तिघींचे यजमान काळाच्या पडद्याआड गेले होते.त्यांच सात्वन करताना नकळतच डोळ्यातून आसवाना वाट करून दिली. सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत दोन दिवस कसे संपले ते कळालेच नाही. शेवटी निरोप घ्यायची वेळ आली. एकमेकींपासून जरी दूर जाणार होतो. तरीसुद्धा आता एकमेकांकींच्या मनाची तार आता जुळली होती . कित्येक वर्षांचा शोध थांबला होता. आज मला खूपच हलक हलक वाटत होत . गोड आठवणी घेऊन परत मंबईचा मार्ग पकडला

                                                                                              सौ. अंजना भिवदास देवकर (मुंबई )

                                                            


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages