आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांनाच संधी : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरात 21 जुलै ते 27 जुलै या दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 5 मध्ये भगवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन शिवसेनेचे विभागप्रमुख आबा सावंत यांच्या निवासस्थानी केले होते. या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या बैठकीस शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख सुरेश जगताप, शशिकांत बिराजदार, शहर संघटक अतुल भवर यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीचे आयोजन उपशहरप्रमुख सुरेश जगताप यांनी केले होते. बैठकीच्या प्रारंभी उपशहरप्रमुख बैठकीचे आयोजक सुरेश जगताप यांनी प्रास्ताविकाध्ये प्रभागात भगवा सप्ताहामध्ये राबविण्यात येणारे विविध लोकोपयोगी उपक्रम आणि शाखा नूतनीकरणाची सविस्तर माहिती दिली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना करत या निवडणुकीत जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळवून देवून त्यांनाच या निवडणुकीत संधी मिळेल असे सांगितले.21 ते 27 जुलै दरम्यान प्रभागात भगवा सप्ताह विविध उपक्रम राबवावून साजरा करावा सोबतच उधवसाहेबांना निरोगी दीर्घायुष लाभण्यासाठी प्रभागातील मंदिरात महापूजा करावी असे आवाहन केले.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून या भागात शिवसेनेचे एकनिष्ठतेने कार्य करत असलेले शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुरेश जगताप यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी शिवसैनिकांना प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना अडचणींमध्ये वेळोवेळी मदत करण्याण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासह संघटना वाढीसाठी अनमोल असे मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस शिवसेना प्रभाग क्रमांक 5 मधील विभागप्रमुख आबा सावंत, अण्णा गवळी, महेश गवळी, उपविभाग प्रमुख भागवत लोंढे, सुरज कुदले, नितीन होमपारखे, दीपक दळवी, उपशहर प्रमुख महिला आघाडी मीनाक्षी गवळी, लिलावती सावंत, रंजना सावंत, सविता मोरे, भारत मोरे, शाखाप्रमुख राहुल परदेशी, मारुती खानापुरे, आकाश कोळी, समर्थ वाघचौरे, सुनील सुरवसे, विश्वास चव्हाण, आबा ताकभाते यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment