टेंभुर्णीत केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार पक्ष) निदर्शने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

टेंभुर्णीत केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार पक्ष) निदर्शने

 टेंभुर्णीत केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीची (शरद पवार पक्ष) निदर्शने 



टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यास तुटपुंजा निधी देऊन निधी वाटपामध्ये अन्याय केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बुधवारी टेंभुर्णी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र शासनाच्या विरोधात "अर्थसंकल्पात एकच दोष,महाराष्ट्र रोष" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संजय कोकाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे माढा तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख, टेंभुर्णी चे माजी सरपंच प्रमोद कुटे,विनोद पाटील यांच्यासह प्रमुख नेते व कार्यकर्ते हे केंद्राने महाराष्ट्र राज्यास अर्थसंकल्पात निधी वाटप करताना महाराष्ट्र राज्यावर अन्याय केल्याच्या भावनेने करमाळा चौकात एकत्र आले होते.यावेळी केंद्राच्या विरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करीत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.तसेच संजय कोकाटे,औदुंबर देशमुख व माजी सरपंच प्रमोद कुटे यांची भाषणे झाली.
या वेळी दयानंद देशमुख, आलेगावचे सरपंच समाधान पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ता.उपाध्यक्ष गणेश कवडे,सरचिटणीस स्वप्नील शिंदे,दादासो गायकवाड,दादा वजाळे,संभाजी वाघे,मृणाल महाडिक,पांडुरंग महाडिक,बाबा महाडिक,गौरव महाडिक,सिद्धेश्वर ताटे,विशाल मस्के,तेजस निंबाळकर,गणेश कुटे,सुरज बागवले,संदीप कुटे,विशाल मस्के,नागेश गायकवाड,भैय्या शेख,शुभम यादव,दीपक देशमुख,शरीफ काझी,अक्षय केचे,गणेश यादव,सौरभ चव्हाण,यश चिवडे,रोहित गिड्डे आदीजन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages