गझल
संधी निघून गेली हलवीत हात बसले
झोपून ओसरीवर काढीत दात बसले
आहे विकास कोठे पुसतात लोक आता
पक्षात फूट पडली भलतेच गात बसले
झाला निसर्ग वैरी मालास भाव नाही
पिकवून शेत मेले मोजीत जात बसले
पाया पडून त्यानी मागून घेतले मत
तेंव्हा कुठे मतांनी सत्तेत आत बसले
पळवाट कायद्याची शोधून काढली अन्
लावून आग येथे दुबईत खात बसले
रामप्रभु गुरूनाथ माने
सोलापूर.मो,9850236045
No comments:
Post a Comment