गुळवंची(ता.उत्तर सोलापूर)येथील पशुपालक विष्णू भजनावळे यांना
त्वरित भरघोस आर्थिक मदत द्या.
आ यशवंत माने यांची पावसाळी अधिवेशनात मागणी.
मोहोळ (कटूसत्य वृत्त ):-मोहोळ मतदार संघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील पशुपालक श्री विष्णू हरिदास भजनावळे या पशु पालकाच्या गुरुवार (दि 4) रोजी सायंकाळच्या वेळेस 28 पैकी 24 म्हशींचा पाण्यात विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे .त्या पशुपालक असलेल्या विष्णू भजनावळे यांना सध्याच्या बाजारमूल्य प्रमाणे जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनाच्या वतीने त्वरित द्यावी तसेच टाकळी सिकंदर(ता.मोहोळ) येथील कु श्रेया कापसे हिचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे त्या कापसे कुटुंबाला देखील शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात केली

No comments:
Post a Comment