मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 2, 2024

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

 मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा  गौरव सोहळा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आवड असलेल्या क्षेत्रात करीयर करा पोलिस उपायुक्तआजच्या धावत्या युगात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्र काबिज करण्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्टा शिवाय यश मिळत नाही त्यामुळे  शिक्षण घेत असताना कोणतेेही दडपण नघेता आपल्या आवडीच्या क्षेत्र निवडले तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी केले.

मराठा सेवा संघ,  विद्या विकास प्रतिष्ठान,  यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परिक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवार दि. 30 जून रोजी  सोरेगाव येथिल  व्ही. व्ही. पी. तंत्रशिक्षण संकुल  येथे पार  पडला यावेळी मार्गदर्शन कराता कबाडे बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर विभागीय अध्यक्ष  प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.जीके देशमुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, दत्तामामा मुळे, प्रकाश ननवरे, प्रा. लक्ष्मण महाडिक, उपस्थित होते. यावेळी  व्ही. व्हीं. पी.कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी प्रवेशासाठी येणार्‍या अडचणी व उपलब्ध संधी याविषयी माहिती दिली.तर प्रशांत पाटील, डॉ. जी.के देशमुख यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.

 कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने झाली त्यानंते जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.  समाजातील 150गुणवंत विद्यार्थ्यांचा  गौरव सोहळा करण्यात आला.शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील  यांनी केले तर आभार प्रदर्शन  प्रा. लक्ष्मण महाडिक  यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. संतोष माने यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages