काँग्रेसने संधी दिल्यास विधानसभा लढणार : हसापुरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंद्रूप, जनतेच्या आशीर्वादाने व नेतेमंडळींच्या सहकार्याने आजवर जिल्हा बँकचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे उपसभापती, जिल्हा दूध संघाचे संचालक, काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष पद भूषविले आहे. या पदावर असताना जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रणिती शिंदे यांनी जर आपल्याला विधानसभेसाठी सोलापूर 'दक्षिण' मधून उमेदवारी दिली
निश्चित न्याय मिळेल जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कामकाज नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. त्यांचा शब्द जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी अंतिम राहील. आपण खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. त्या निश्चितच न्याय देतील, असा विश्वास सुरेश सापुरे यांनी व्यक्त केला.
तर आपण निवडणूक लढविणार आहोत. जर पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिल्यास त्यांचाही प्रचार प्रामाणिकपणे करणार असल्याचे जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी सांगितले.
हसापुरे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून अनेक नेतेमंडळी काँग्रेस सोडून जात असताना आपण सुशीलकुमार शिंदे, खासदार शिंदे, सिध्दाराम म्हेत्रे यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नव्वद गावात व जुळे सोलापुरातील काँग्रेस कार्यकत्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी धावून गेलो. बँकेच्या माध्यमातून
शेतकरी बांधवांना आपण लोकसभा भरीव कर्ज पुरवठा केला. दक्षिण तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ५८ सोसायटीवर आणि अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आणली.
गेल्या दहा वर्षांपासून देशात, राज्यात व तालुक्यात काँग्रेसची सत्ता नसल्याने निराश झालेल्या काँग्रेस कार्यकत्यांना, सोसायटीचे संचालक, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना एकत्रित करून ती ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी केली.
प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून शासनाकडून कोट्यवधींचा विकास निधी दक्षिण सोलापूरला मिळवून दिला.निवडणुकी काँग्रेसची सर्व यंत्रणा आपण सक्षमपणे सांभाळली. आमदार शिंदे यांचा दक्षिणमध्ये गावभेट दौरा, काँग्रेसचा संकल्प मेळावा व प्रचार सभा यशस्वी केल्या.
तालुक्यात गत निवडणुकीत भाजपला ३८ हजारांचे मताधिक्य होते. दिवसरात्र प्रचार करून भाजपचे मताधिक्य घटवून काँग्रेसला दहा हजार मतांची आघाडी मिळवून दिली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोलापूर बाजार समितीची निवडणूक आपण लढणार नाही. खासदार शिंदे यांनी सांगितले तर पॅनल उभे करून कार्यकत्यांना संधी देऊन त्यांना निवडून आणू, असेही हसापुरे यांनी सांगितले.
.jpg)
No comments:
Post a Comment