वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार,२७ जुलै रोजी होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार,२७ जुलै रोजी होणार

वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार,२७ जुलै रोजी होणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चालू वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, २७ जुलै रोजी होणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सलमान आझमी यांनी केले आहे.यावेळी लोकअदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कलम १३८ एन. आय.ॲक्टची पकरणे अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे,कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे,वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे,भूसंपादन बाबतची प्रकरणे, तसेच बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था यांच्या वसुलीच्या दरखास्त बँक लवाद दरखास्त इत्यादी (प्रलंबित व दाखलपूर्व )प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.ज्या पक्षकारांना लोकअदालतमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होता येणार नाही,त्यांच्यासाठी आभासी पद्धतीने म्हणजे ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages