छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता बघून ज्या अभेद्य किल्ल्यांच्या आधारावर स्वराज्य निर्माण केले, त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील शिवभक्त व गडकिल्लेप्रेमी एकत्र येणार आहेत.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात युनेस्कोची टीम किल्ल्यांना भेटी देणार आहे.येणार सप्टेंबर महिन्यात युनेस्कोची टीम आहे. तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले १२ किल्ले संवर्धन, स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन गौरवशाली इतिहासाचे संवर्धन करावे यासाठी राज्यभरात नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. नोंदणीसाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून, त्याची लिंक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment