राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वतीने करमाळात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारने सादर केलेल्या आर्थिक बजेटमध्ये महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वतीने करमाळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १०:३० वाजता निदर्शने करण्यात आले.केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष असे बॅनर लावून निदर्शने करण्यात आली. असे म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एकच दोष,महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष असे बॅनर लावून निदर्शने करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच प्रमोद कुटे, प्रा.विनोद पाटील, संजय कोकाटे, दयानंद महाडिक, ता. उपाध्यक्ष गणेश कवडे, ता.चिटणीस स्वप्निल शिंदे, सरचिटणीस सिद्धेश्वर ताटे, टेंभुर्णी शहराध्यक्ष संदीप कुटे, दत्ता खडके, विशाल मस्के,अल्पसंख्याक ता. अध्यक्ष भैय्या शेख,संभाजी वाघे, आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment