Hot Posts

6/recent/ticker-posts

सुप्रिया ताई सुळे यांची मीनल ताई साठे यांनी घेतली भेट...माढा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 सुप्रिया ताई सुळे यांची  मीनल ताई साठे यांनी घेतली भेट...माढा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

           टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): खासदारकीची निवडणूक होताच माढ्याच्या मीनल ताई साठे यांनी आमदारकीसाठी जोरदार तयारीला लागले असून त्यांनी आतापर्यंत  गाव भेट दौरे व सर्व सामान्यांच्या अडचणी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून नुकतेच पुणे येथे एका कार्यक्रमाला गेल्यानंतर माढा नगरपंच्यातच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी पुण्यात घेतली खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट. 

           भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भेटीमुळे अनेक दिवसापासून साठे घरांना सहकार महर्षी कै.गणपतराव साठे, माजी आमदार धनाजी साठे व दादासाठे हे काँग्रेसचे निगडित असल्याने त्यांना आमदारकीसाठी उभारायचे असल्याने व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची युती असल्याने ही जागा शरद पवार गट राष्ट्रवादीच्या गटाकडे जाणार असल्याने व सध्याचे आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटात ला आमदारकीचे तिकीट हे शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याने मीनल ताई साठी यांच्यापुढे पेच! निर्माण झाला असल्याने आता त्या सुप्रियाताई सुळे यांना भेटून राष्ट्रवादी प्रवेश करणार का ? माढा लोकसभेचे त्यांना आमदारकीचे राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार का ? अशा चर्चेला तालुक्यात उधाण आले असून जर राष्ट्रवादीने मीनल ताई साठे यांचा प्रवेश करून तिकीट देणार काय दिले तर माढा तालुक्यात रंगत कशी होईल याबाबत चर्चा होऊ लागले असून याबाबत पत्रकारांनी मीनल ताई साठे यांना भेटीबाबत दूरध्वनी वरून विचारले असता त्यांनी सांगितले की स्वाभिमानी जनतेच्या साथीने महासंसदरत्न मा. सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय झाल्याबद्दल पुण्यात प्रत्यक्ष भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले व मायबाप जनतेच्या सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या! असे सांगून चर्चेबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

           यावेळी सोबत कूर्मदास सह साखर कारखाना चे संचालक काँग्रेस नेते श्री दादासाहेब साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, सभापती अरुण कदम, विकास साठे, नितिन साठे, नगरसेवक अजिनाथ माळी, नितीन साठे, शबाना बागवान, निर्मला थोरात, मोहीनी नेटके, गितांजली देशमुख, बाबुराव नेटके,  मुन्ना बागवान, गणेश हिंगरे, मारुती पवार आदी उपस्थित आदी यावेळी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments