Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामगृह चालू करावे..‌.

टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामगृह चालू करावे..‌.

टेंभुर्णी चे सामाजिक कार्यकर्ते व मीरा फाऊंडेशन, संस्थापक अध्यक्ष मयुर काळे यांची मागणी.

          टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): टेंभुर्णी हे शहर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच दिल्ली ते बेंगलोर तसेच सातारा म्हसवड लातूर अशा मार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे उद्योग व व्यापार  मोठ्या प्रमाणात होत असतो. शासकीय विविध बैठका, विविध संघटनांच्या बैठका तसेच अधिकारी, पदाधिकारी यांच्या मुक्कामाच्या सोयीने शासकीय विश्रामगृह चालू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने ज्या कारणासाठी शासकीय व विश्रामगृह उभा केले आहे ते कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे गैरसोय होत आहे. केवळ कामगार भरती अभावी बंद असल्याने शासनाच्या पैशाचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून येते.

          टेंभुर्णी तालुका माढा येथील कामगार भरती अभावी बंद अवस्थेत असलेले शासकीय विश्रामगृह लवकरात लवकर चालू करावे ही विनंती न निवेदन त्यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी, विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर, आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील (विधान परिषद महाराष्ट्र राज्य) व खा. धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील (माढा लोकसभा) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments