मौलाना आझाद पॉलिटेक्निक कॉलेजचा 92% निकाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये शाखा निहाय पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष नसिर अहमद खलिफा तसेच संस्थेचे सचिव नुराशा सय्यद यांना उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मो. अनवर जानवाडकर (माजी प्रार्चाय, लुकमन कॉलेज ऑफ फॉर्मसी, गुलबर्गा) व यासिन शेख (व्यापार मार्गदर्शक) यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेकडुन वरील मान्यवराचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना कॉलेजचे प्राचार्य सर्फराज शेख यांनी केली. प्रस्तावना करित असताना त्यांनी उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये उर्त्तीण झालेल्या मुलांचे अभिनंदन केले तसेच कॉलेजचा एकुण निकाल 92%, कॅम्युटर, इलेक्ट्रीकल व इलेट्रॉनिकस् शाखेचे 100% निकाल लागल्याचे सांगण्यात आले. मुलांना प्रोत्साहण म्हणून पारितोषिक कार्यमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
जानवाडकर सर यांनी मुलांना मार्गदर्शन करीत असताना मुलांनी शिक्षण घेऊन ते शिक्षण आपल्या पर्यत न ठेवता ते समाजासाठी त्याचा उपयोग करत असताना आपण समाज सुधारक होण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर मुलांना करिअर मार्गदर्शन करुन मुलांना बोलते करून त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण करून दिशा दर्शक म्हणून मोलाचे कार्य त्यांनी केले.
यासिन शेख सर यांनी मुलांना ध्येय निश्चिती कसे करावे ते करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे तरुणामध्ये मोबाईलचे वेढ कशा प्रकारे जोपासले जात आहे त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. त्यामुळे संस्थेतील मुलांनी आत्ताच ठरविण्याची गरज आहे की भविष्यात आपण काय करणार अशा प्रकारे मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. अतिया शेख तसेच नमिरा शेख यांनी केले तसेच कार्यक्रम पारपाडण्याठी अझरोद्दीन गिरगावकर, शब्बीर पटेल,आरती काळे मॅडम, निता वाघमारे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
0 Comments