लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 23, 2024

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे हे अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी मंजुनाथ कुंभार, नक्षत्रा कांबळे, आरती खूने आदींनी गुरुपौर्णिमा, गुरूशिष्य ऋनाणुबंध याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा. सागर महाजन यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमा, गुरू शिष्य परंपरा, आदर्श गुरू व शिष्य, गुरूशिष्य ऋनाणुबंध याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असते. गुरू आपल्याला जीवनात आवश्यक सुसंस्कृतपणा, प्रामाणिकपणा, कौशल्ये, व्यापक दृष्टीकोन, यशस्वी जीवनाची सूञे यासारख्या विविध विषयांवर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर मार्गदर्शन करत असतात. आपल्याला येणारे अनुभव हे सुद्धा आपले गुरू आहेत. जीवनात एक तरी उत्तम मार्गदर्शक गुरू असणे आवश्यक आहे असे मनोगत प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांनी यावेळी व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी नक्षत्रा कांबळे यांनी  केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. पुनम उंबरे, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. मंजुश्री डोंगरे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages