कुंभारीत ऑटो रिक्षामधून 40 हजाराची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

कुंभारीत ऑटो रिक्षामधून 40 हजाराची दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 कुंभारीत ऑटो रिक्षामधून 40 हजाराची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षामधून विदेशी दारू व बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंदवून एक लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील तीन दिवसापासून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती विक्री , देशी-विदेशी दारू, ताडी विक्रीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत वीस गुन्हे नोंदविण्यात आले असून 88 लिटर बियर, 36 लिटर विदेशी दारू, 12 लिटर देशी दारू, 120 लिटर ताडी, 338 लिटर हातभट्टी दारू व 8100 लिटर रसायन जप्त केले आहे. याच मोहिमे अंतर्गत   गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ब  विभागाच्या पथकाने कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक MH13 EF 0455 मधून राहुल बाळू  करदास, वय 27 वर्षे, रा. निल नगर एमआयडीसी हा विदेशी दारू व बीअरची वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या ताब्यातून विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 114 बाटल्या व बियरच्या विविध ब्रॅंड्सच्या 650 मिली क्षमतेच्या 126 बाटल्या असा एकूण 40,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वाहनाच्या किमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख 90 हजार 560 इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद करीत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.



आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages