भारताचा प्राण आहे संविधान हे प्रत्येक भारतीयांनी जाणून घ्यावे-- संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

भारताचा प्राण आहे संविधान हे प्रत्येक भारतीयांनी जाणून घ्यावे-- संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र....

 भारताचा प्राण आहे संविधान हे प्रत्येक भारतीयांनी जाणून घ्यावे-- 

 संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र....

नरखेड (कटूसत्य वृत्त):- युवा जागृती मंचच्या वतीने दिनांक 25 /7/ 2024 रोजी मोहोळ येथील शहाजीराव पाटील ज्युनिअर कॉलेज नरखेड येथे व तसेच नजीक पिंपरी येथील समाज कल्याण च्या निवासी शाळेत संविधान संवाद शाळेचे आयोजन केले होते .या संविधान संवाद शाळेत  विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी संविधान संवाद समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव राजवैभव शोभा रामचंद्र आलेले होते .

त्यावेळी त्यांनी आपले भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयाचा प्राण आहे हे प्रत्येक भारतीयांनी जाणून आत्मसात करून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे संबोधित  विद्यार्थ्यांना केले.. या संविधान संवाद शाळेत विद्यार्थ्यांना गाथेतून अभंगातून तसेच कवितातून उदाहरणातून भारतीय संविधानाची नीती मूल्ये हक्क अधिकार तसेच संविधानातील उद्देशिकेतील मूल्यांविषयी सविस्तर सांगण्यात आले.


या संविधान संवाद शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक हे उपस्थित होते. या कार्यक्रमास शहाजीराव पाटील कॉलेजचे चेतन पाटील सर निवासी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर ,युवा जागृती मंचचे संस्थापक ॲड.आकाश कापुरे,तेलंगे सर,हरी सरवदे,दिपक वाघमोडे ,संजय ललोढे , शैलेश कुचेकर प्रविण साळवे,माऊली सोलंकर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages