विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 25, 2024

विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

 विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160  दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या

 आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा सोलापूर येथे दिनांक 25 जुलै 2024 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले  यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली. समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत  विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने पुरविण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन MPRTC, मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक 6,जोड बसवन्ना चौक ,सोलापूर येथे  दिनांक 26 व 27 /02/2024रोजी  करण्यात आले होते.


या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण,महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत  आणि ADIP योजनेतून  विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने , वाटप करण्यात आली आहेत . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्री गिरीश पंडित यांनी केले. स्वागतगीत अक्षय जंगलगी या विद्यार्थ्यांनी सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे व पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केले., या साहित्य साधने वाटप कार्यक्रमांमध्ये एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य साधनांमध्ये  तीन चाकी सायकल 09, कुबड्या 20, सुगम्य केन 19, ब्रेलकिट 11, कानापाठीमागील श्रवण यंत्र 88, सीपी चेअर विथ कमोड 26, व्हीलचेअर 46, रोलेटर 30, स्मार्टफोन 24 अशाप्रकारे एकूण 286 प्रकारची साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालक यांना संबोधित आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडथळा होऊ नये, मुक्त संचार   करता यावा, विद्यार्थ्यांच्या  शिक्षणातील आव्हाने कमी होण्यास यामुळे निश्चितपणे मदत होणार आहे असे मत व्यक्त केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना थेरपीची आवश्यकता आहे .त्यांनी महानगरपालिका सोलापूर अंतर्गत असणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित पालकांना केले. या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त  तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त  गिरीश पंडित, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी  संजय जावीर, पर्यवेक्षक,  भगवान मुंडे ,लष्कर आवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन सौ .स्नेहा पुजारी सहशिक्षिका यांनी केले . या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार  संजय जावीर, प्रशासन अधिकारी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विशेष शिक्षक व विषयतज्ञ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages