वेणेगाव ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

वेणेगाव ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार

 वेणेगाव ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचा वेनेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले माढा तालुक्यातील जनतेने मला फार मोठे सहकार्य केलेले आहे .तसेच मला निवडून आणण्या पाठीमागे माढा तालुक्यातील जनतेचा फार मोठा वाटा आहे .माढा तालुक्यातील प्रत्येक गावाने मला आपलंसं मानलेले आहे.यामुळे माढा तालुक्यातील प्रत्येक गावासाठी माझ्या परीने मी बहुमोल असे योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे .आपल्या गावातील काही अडीअडचणी असतील तर त्या मला सांगा मी त्या अडीअडचणी आपला माणूस म्हणून तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करेन."
याप्रसंगी त्यांच्याबरोबर आलेले  शिवतेज मोहिते पाटील ,बाळासाहेब पाटील, शिवा नाना कांबळे, भारत नाना पाटील सापडण्याचे माजी उपसरपंच दत्ता पाटील, तसेच इतर मान्यवरांचाही सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजू भोंग ,हरी कदम , राजू जठार ,पोपट मामा लोंढे, सिताराम क्षीरसागर , जाधव ,कुंटे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages