भोगाव भागात आजार फैलावण्याची शक्यता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शहर, जिल्ह्यातून संकलित केलेले मेडिकल वेस्ट वर्गीकरण न करता भोगावच्या प्रकल्पामध्ये जाळले. त्यामुळे परिसरात काळ्या धुराचे कण पसरले. त्या धुरात कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे भोगाव भागातील नागरिकांना टी.बी. सह श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामुळे जवळपास दोन हजार लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिसरातील दोन हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी रविवारी भोगाव येथील बायोमेडिकल ठेवल्याचे वेस्ट प्रकल्पाची अचानक तपासणी केली. त्यावेळी तेथे प्रक्रिया न केलेले २०० टन बायोमेडिकल वेस्ट साठवून ठेवल्याचे उघडकीस आले
.jpg)
No comments:
Post a Comment