छत्रपती संभाजीनगर, (कटूसत्य वृत्त):- राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभं केलंय.
तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओसीबी आरक्षण बचावसाठी उपोषण केलं होतं. सध्या दोघांनाही उपोषण सोडलं असलं तरी वातावरण तापलेलंच आहे. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टरांना काळं फासल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्याने डॉक्टरांच्या तोंडाळा फासले काळे
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. मनोज जरंगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्यामुळे तोंडाला काळे फासल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. अर्ज दिलेल्या रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. धक्कादायक म्हणजे आधी सत्कार केला आणि नंतर काळे फासले. या घटनेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये शांतता रॅलीचे आयोजन
बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी बीड येथे काल सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुकानिहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यासाठी बीड जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. ही रॅली 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग नोंदवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. काय म्हणाले जरांगे पाटील
मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या पक्षातील ओबीसी नेते हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी एकवटले आहेत. ते मताचा विचार करत नाहीत आरक्षणाचा विचार करत आहेत.मात्र आपले नेते मतांचा विचार करतात. मराठ्यांच्या नेत्यांनी समाझदारीची भूमिका घेणे गरजेचे आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते हे सगळे ओबीसी नेते एकवटले आहेत हे मराठा नेत्यांना समजत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment