मविआ समोर मोहोळ, दक्षिण सोलापूर अन् करमाळ्याचा पेच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 25, 2024

मविआ समोर मोहोळ, दक्षिण सोलापूर अन् करमाळ्याचा पेच

 मविआ समोर मोहोळ, दक्षिण सोलापूर अन् करमाळ्याचा पेच



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील सोलापूर व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ जागावाटपात अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहेत. शिवसेनेला त्याठिकाणी संधी नसल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना समसमान जागा द्याव्या लागतील हे निश्चित.

दुसरीकडे काँग्रेसचा सद्य:स्थितीत तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाच मतदारसंघांवर दावा आहे. सांगोला मतदारसंघ 'शेकाप'ला सोडावा लागणार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सद्य:स्थितीत दोनच जागा मिळतील अशी स्थिती आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. मोहोळमध्ये मागील विधानसभा निवडणुकीतील तिन्ही उमेदवार आता महायुतीसोबत आहेत. माळशिरसमध्ये मागच्यावेळी मोहिते-पाटलांच्या मदतीने सातपुते आमदार झाले होते. करमाळ्यातही मोहिते-पाटलांची राजकीय ताकद आहे. माळशिरस, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, करमाळा, माढा या मतदारसंघातील आमदार महायुतीचेच आहेत, तरीदेखील लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तेथून मताधिक्य मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी विधानसभेला ताकदवान चेहऱ्याला संधी देऊ शकते. काही मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होऊ शकते. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची मदत प्रबळ ठरणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी व काँग्रेसची मदत त्यांच्या उमेदवारांना आमदार करणार, याचीही उत्सुकता असणार आहे. तत्पूर्वी, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला इच्छुकांची नाराजी न ओढावता मतदारसंघांचा पेच सोडवावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages