विद्या निकेतन प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्या निकेतन प्रशालेत विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून प्रवेश उत्सवाचा समारंभ अतिशय आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला .
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. गुणवंत पोटरे हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पवार, ज्ञानेश्वर सिरसट, अमोल आतकरे हे उपस्थित होते.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक मा. राजेंद्र जाधव सर यांच्या शुभहस्ते नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प व खाऊ देऊन पुष्प वर्षाव करत स्वागत करण्यात आले. इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी वर्गात उत्कृष्ठ यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक वर्ग रांगोळ्या, गुलाब पुष्पांच्या पायघड्या ,फुगे वगैरे लावून सजाविण्यातआले होते प्रत्येक विद्यार्थ्यांला गुलाब पुष्प देऊन, जिलेबीचा गोड खाऊ भरवून स्वागत करण्यात आले व त्यांना पुस्तके देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक जेष्ठ रावसाहेब पाटील, रविकांत साबळे,सौ. कांचन पवार, सौ. अंजना पोटरे मॅडम, शहाजी आतकरे, गोविंद जांभळे, संतोष वाघमोडे व सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मोलाचे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद बोधले सरांनी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कांत हजारे सरांनी मानले.

No comments:
Post a Comment