संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरजिल्ह्यातून कोणाला संधी ?
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला २७ सुरुवात होणार असून त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत महायुती सरकारने दिले असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी त्यानंतर आता सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारमध्येही सोलापूरला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आता संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचे लक्ष वेधले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत, तर बार्शीचे राजेंद्र राऊत हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. याशिवाय रणजितसिंह मोहिते-पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. माढ्याचे बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार असून करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे पक्षाचे सहयोगी आमदार आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) एकमेव आमदार शिंदे यांच्या माढा मतदारसंघातही आहेत. मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान नसल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूरला महायुतीच्या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असतानाही सगळ्याच आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मताधिक्यात घट झाली. माढा लोकसभा मतदारसंघातही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीला मतांची आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास मिळालेल्या मतांच्या गुणवत्तेनुसार विचार करता एकाही आमदाराला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणे कठीण आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारास मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते. बबनराव शिंदे, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगण्यात येते.
.jpg)
No comments:
Post a Comment