राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु

 राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु


होत असून १७४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज म्हणजेच एका जागेसाठी तब्बल १०१ अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० % हून अधिक आहे.

यामध्ये चूक कोणाची? इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिली सारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही म्हणून पोलीसभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवांची की युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची?
ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. पण दुर्दैवाने आपल्या प्रगत महाराष्ट्रात याची चर्चा होणार नाही, कारण हे विषय सर्वसामान्यांचे गोरगरिबांच्या पोरांचे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर मात्र आज जोरदार चर्चा होतेय. आज सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील ही अपेक्षा!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages