शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आज शुक्रवार दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
योग साधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणल्या जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात येतो. यावेळी शारीरिक व्यायाम व हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली. योगाची सर्व प्रात्यक्षिके क्रिडा शिक्षक .ए.पी.राऊत आणि एम .व्ही बुरांडे यांनी करून दाखवली यामध्ये शाळेचे प्राचार्य . एस.व्ही इंगोले सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब (काका) देशमुख, सचिव
हर्षवर्धन (दादा) देशमुख, संचालक सूरज देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका.प्रियंका देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment