उजनीमध्ये क्रूझ अन् बोट सफर; धरण परिसरात पॅव्हेलियन होणार
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातील जलपर्यटन आणि जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास, अशा विविध कामांचा समावेश असलेल्या २५० कोटींच्या पर्यटन विकास आराखड्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंजुरी दिली. यामध्ये १५० कोटींहून अधिकची कामे एकट्या उजनी धरणाच्या परिसरात प्रस्तावित केली आहेत. धरणात क्रूझ सफारी, बोट सफर सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच धरण परिसरात मोठे पॅव्हेलियन उभारणार असल्याचे प्रस्तावित आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी पर्यटन विकास आराखड्याची बैठक झाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विभागांच्या मदतीने तयार केलेला आराखडा सादर केला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजयमामा शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पर्यटन विकास आराखड्याच्या बैठकीत सादरीकरण पाहताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजयमामा शिंदे आदी. धरण परिसरातील प्रस्तावित कामे
उजनी परिसरात मोठे पॅव्हेलियन तयार करणार.
■ देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव तयार करणार.
धरणात बोट सफर, वॉटर स्पोर्ट्स, क्रुझ सफारी यासाठी डॉक तयार करणार. ■ पर्यटकांच्या निवासस्थानाची सोय, कृषी पर्यटनाची कामे करणार. ■ २० जूनपासून जागा निश्चितीसाठी सर्वेक्षणाला सुरुवात होणार. ■ निसर्गरम्य, पक्षी निरीक्षणासाठी जागा तयार करणार. ९४ धार्मिक स्थळे विकसित करणार सोलापूर जिल्हा हा मंदिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील ९४ धार्मिक स्थळांचा विकास, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटनाचा समावेश.
अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते. या आराखड्यावर आमदार शिंदे, आमदार देशमुख यांनीही सूचना केल्या. हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारला सादर होणार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment