आता धनगर समाजातील विद्यार्थी मोफत शिकणार इंग्रजि शाळेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 20, 2024

आता धनगर समाजातील विद्यार्थी मोफत शिकणार इंग्रजि शाळेत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश


 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये लिटील बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ, ता. मोहोळ जि. सोलापूर आणि श्रीराम इंग्लिश स्कूल पाणीव ता. माळशिरस, जि. सोलापूर या दोन शाळांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शाळांमध्ये मोफत प्रवेशाकरिता अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, याठिकाणी संपर्क साधा

धनगर प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ५ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सोलापूर, पत्ता ३बी / १, अ / ३२, राघवेंद्र नगर, सूर्या हॉटेलजवळ, राघवेंद्र स्वामी मठाच्या पाठीमागे मुरारजी पेठ, सोलापूर येथे ३० जून २०२४ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनीषा फुले यांनी केले आहे. जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड व पालकांचे एक लाख रुपये मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सदर शाळांमधील अन्य प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसमवेत एकत्रितपणे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच सदर शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश मंजूर झाल्यास पुढे इयत्ता बारावीपर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहील, असेही इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनीषा फुले यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages