वडीलांच्या नावाबरोबरच आईचे नाव लावण्याचा अजितदादांनी घेतलेला निर्णय स्त्रीशक्तीच्या अस्तित्वाचा मोठा सन्मान करणारा आहे
- सोनाली गाडे
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी युवती नुतन पदाधिकाऱी नियुक्तीपत्र प्रधान समारंभ तसेच 10 वी 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला
याप्रसंगी प्रास्ताविक करताना युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी सांगितल की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी युवती अध्यक्ष पदी संधी दिली मला मिळालेल्या या संधीचे सोनं करून अजित दादा चे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळा पर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेन ...
नुतन पदाधिकाऱी यांना युवती संघटनेत काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा असे मत महिला शहराध्यक्षा संगीताताई जोगदनकर यांनी व्यक्त केले ..
राष्ट्रवादी युवती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी आपल्या मनोगतात
अजितदादांनी महिलांसंदर्भात राबवलेली महिला धोरणे सांगून प्रत्येक व्यक्तीच्या नावामध्ये त्याच्या वडिलांबरोबर आईचा नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यानी घेतला या निर्णयाने स्त्रीशक्तीच्या अस्तित्वाचा खूप मोठा सन्मान माननीय अजित दादा पवार यांनी केला आहे .नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देत त्यांनी महीला व बालकल्याण विभागाचा सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत करावे तसे गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
10 वी 12 वी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थी स्नेहा गंगदे, गौरांग मामड्याल यशस्वी जाधव ,प्राजक्ता पवार प्रेम जगताप ,ध्रुव धवाने ,नवीन येलगेटी ,वैदेही माने ,लक्ष्मी पेंडकर ,अंकिता अलवाल सिद्धी लांघे ,अनुष्का मोरे अंकिता तडगोपुल ,रितेश बनसोडे आदित्य महांकाळ हर्षिता बेत समर्थ माने ,रियाज शेख संस्कृती कणसे ,समर्थ सनके अखिल कोरडे शिवकुमार आडम मंथन राऊत ,गौरांग माने ,भरत श्रीराम या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ..
त्याचबरोबर नूतन युवती कार्याध्यक्ष पदी पल्लवी पाटील उपाध्यक्षा प्रज्ञा कदम आशा भोई सरचिटणीस पूजा जाधव गौरी यादव श्रुतिका शीगरकंटी सचिव प्रियंका कांबळे सहसचिव सुजाता राजपूत संघटक वैष्णवी वाघमारे सोशल मीडिया अध्यक्ष प्रियंका जगझाप यांची निवड करण्यात आली .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे माझी नगरसेवक नारायण माशाळकर अमीर शेख संजय मोरे रुपेश भोसले बसवराज कोळी शामराव गांगर्डे नागेश निंबाळकर संजय सांगळे अनिल बनसोडे दत्तात्रय बडगंची दत्तात्रय वाघमोडे सचिन चलवादी दशरथ शेंडगे सोमनाथ शिंदे फिरोज शेख महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कस्पटे प्रिया पवार कांचन पवार सुरेखा घाडगे शोभा गायकवाड आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काॅग्रेस शहराध्यक्ष किरण माशाळकर यांनी केले होते ....



No comments:
Post a Comment