विद्या निकेतन प्रशालेत जागतिक योग दिन संपन्न
सोलापूर(कटूसत्य वृत्त);-मसले चौधरी मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील जवाहर ग्रामविकास मंडळ वाळूज संचलित, विद्या निकेतन प्रशालेत "जागतिक योग दिन" प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सुरुवातीला योगाचे महत्व व फायदे याबाबत क्रीडा शिक्षक शिवानंद बोधले सर यांनी माहिती सांगितली. त्यानंतर शारीरिक हालचाली सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम व ध्यान इत्यादी व्यायाम प्रकार घेण्यात आले.
इ. 5 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्साहाने योगाचे महत्व समजून घेऊन प्रात्यक्षिक केले.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक रावसाहेब पाटील सर, कांत हजारे सर, रविकांत साबळे सर, कांचन पवार मॅडम. अंजना पोटरे मॅडम तसेच संतोष वाघमोडे हे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment