ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांचा डाॅ.गजानन कोटेवार यांनी केली सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 29, 2024

ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांचा डाॅ.गजानन कोटेवार यांनी केली सन्मान

ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांचा डाॅ.गजानन कोटेवार यांनी केली सन्मान


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-बदलत्या परिस्थितीमध्ये ग्रंथालय कार्यकत्यांचा सन्मान करण्याचा योग आला. ग्रंथालय प्रश्नाला चालना देण्यासाठी ग्रंथालय कार्यकर्ते योगदान देतात, आपले जीवन परमार्थपणे, कृतार्थपणे जगतात. ग्रंथालय कार्यकर्ते हे तन-मन-धनाने काम करीत असतात, त्यांचाही सन्मान कुठेतरी व्हायलाच पाहिजे असा विचार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी मांडले. यावेळी कुंडलिक मोरे,सोलापूर, खंडेराव  सरनाईक, हिंगोली, प्रदीपजी दाते,नरेंद्र हेमके यांनीही मनोगत व्यक्त केले. लोकशिक्षण प्रसारक मंडळ, वर्धा येथे राजश्री शाहू महाराज जयंती आणि दे .सी. हेमके गुरुजी यांची पुण्यतिथी " सामाजिक न्याय दिन "या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुंडलिक मोरे, सोलापूर, खंडेराव सरनाईक,हिंगोली, शामराव वाहूरवाघ, अकोला, भाऊराव पत्रे, गडचिरोली, राम मेकले, लातूर, युवराज जाधव, लातूर, प्रल्हाद इंगळे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.नितीन सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, वर्धा यांचाही सत्कार  करण्यात आला. यावेळी अमृतराव लवूळकर, माधवराव ठाकरे, रवींद्र मेणसे, संजय कोटेवार, तारा कोटेवार, गोडसे सर, प्रदीपजी दाते, प्राचार्य डॉ .महेंद्र सहारे, नरेंद्र हेमके  स्मिता मिसाळ सह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages