ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणीवर सराफचा अत्याचार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 3, 2024

ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणीवर सराफचा अत्याचार

 ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणीवर सराफचा अत्याचार 


सोलापूर(कटूसत्यवृत्त):-ग्राहक म्हणून आलेल्या एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणीला सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका हॉटेलात बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि विवस्त्र करून चित्रिकरण करून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यासह रिव्हॉल्व्हर काढून धमकावल्याप्रकरणी एका सराफाला पोलिसांनी अटक केली आहे.

माणिक सुरेश नारायणपेठकर असे आरोपीचे नाव आहे. यातील पीडिता ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणी २६ वर्षांची असून ती मूळ आग्रा येथील राहणारी आहे. बंगळुरू येथील एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार मैत्रिणीच्या सांगण्यावरून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती काम मिळविण्यासाठी सोलापुरात आली होती. ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळविण्याच्या प्रयत्नात असताना तिने सराफ बाजारात माणिक नारायणपेठकर याच्या सराफ पेढीमध्ये स्वतःच्या भावासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली. तेथे तिच्याशी नारायणपेठकर याने ओळख करून घेत तिचा संपर्क क्रमांक घेतला. अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांशी आपल्या ओळखी असून त्यांच्या माध्यमातून आपण काम मिळवून देऊ शकतो, असे त्याने आश्वस्थ केले होते. माणिक सुरेश नारायणपेठकर असे आरोपीचे नाव आहे. यातील पीडिता ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरूणी २६ वर्षांची असून ती मूळ आग्रा येथील राहणारी आहे. बंगळुरू येथील एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार मैत्रिणीच्या सांगण्यावरून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती काम मिळविण्यासाठी सोलापुरात आली होती. ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळविण्याच्या प्रयत्नात असताना तिने सराफ बाजारात माणिक नारायणपेठकर याच्या सराफ पेढीमध्ये स्वतःच्या भावासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली. तेथे तिच्याशी नारायणपेठकर याने ओळख करून घेत तिचा संपर्क क्रमांक घेतला. अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांशी आपल्या ओळखी असून त्यांच्या माध्यमातून आपण काम मिळवून देऊ शकतो, असे त्याने आश्वस्थ केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages