Hot Posts

6/recent/ticker-posts

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर. अंर्तगत मुळेगाव ग्रामपंचायत येथिल तातडीची पाणीपुरवठा योजनेचा व जगदंबा नगर ते सवितानगर येथिल सिमेंट कॉकिट रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न

 बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर. अंर्तगत मुळेगाव ग्रामपंचायत येथिल तातडीची पाणीपुरवठा योजनेचा व जगदंबा नगर ते सवितानगर येथिल सिमेंट कॉकिट रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मुळेगाव ग्रामपंचायत येथे दामलेवस्ती, उष्र्कषनगर, महात्मा फुले नगर या भागात बोअर वर पाणीपुरवठा होतो दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या होत असते. गावातील सदस्य, सरपंच आणिउपसरपंच शिवराज जाधव यांनी याभागास पाणीपुरववठा करणेकरीता बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या ट्रॅन्करची मागणी केली. बालाजी अमाई न्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळानी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवले. गावाच्या जवळच दामलेवस्ती येथिल भागात असलेल्या पाणीपुरवठा विहीरीवरून ६०० मीटर पाईप लाईन केल्यास दामलेवस्ती, उष्र्कष नगर, फुलेनगर याभागाची पाण्याची समस्या पुर्ण मिटेल या उद्देशाने हया कामास व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळानी त्वरीत मंजुरी दिली .


बालाजी अमाईन्सच्या तातडी ची पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे व बालाजी स्पेशालिटी केमिकल्स च्या वतीने जगदंबानगर येथे करण्यात आलेल्या सिमेंट कॉकिटच्या रस्त्याचे आज १.०६.२०२४ रोजी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या हस्ते येथे पाण्याच्या टाकीचे पुजन करून व नारळ वाढऊन या कामाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी बालाजी अमाईन्सच्यावतीने सोलापुर व धाराशिव जिल्हयातील सी.एस.आर अंर्तगत विविध  कामाची माहीती नागरीकांना सांगितली बालाजी अमाईन्सच्यावतीने पाणी टंचाई काळातयंदाच्यावर्षी कासेगाव येथिल पाणीपुरवठा विहीरीचे खोलीकरणाचे काम तसेच धाराशिव जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथिल पाणीपुरवठा विहीरीचे खोलीकरणाचे काम केल्यामुळे यंदाच्यावर्षी हया दोन्ही गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला जगदंबानगर येथिल सिमेंट कॉकिटच्या रस्त्याचे संचालक राम रेडडी यांचे हस्ते नारळ वाढऊन पुजन करण्यात आले


तातडीची पाणी पुरवठायोजने समाविष्ठ कामे.

१ ग्रामपंचयतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर ५ एच.पी पाणबुडी पंप.

२ ६३ मी.मी. पीव्हीसी उर्ध्वनलिका (पाईपलाईन) ५०० मीटर ३ ३००० लिटर क्षमतेच्या ३ तीन पाण्याच्या टाक्या बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि यांचेवतीने मुळेगाव येथिल जगदंबा नगर ते सवितानगर पर्यंत ५६० मीटर सिमेंट कॉकिट रोड करण्यात आला.

या कार्यकमास बालाजी अमाईन्स चे सी.एस.आर प्रमुख मल्लिनाथ बिराजदार, मुळेगावचे सरपंच सविता शिवराम भोसले, उपसरपंच शिवराज दाजी भोसले,, ग्रामपंचायत सदस्य मंगल भुजंग खरात, अजमेरा, ग्रामसेवक रमेश गायकवाड , नलपती अपपा बनसोडे माजी सभापती, राहुल जाधव, शिवराम भोसले, संतोष जाधव, भारत कोळेकर, मल्लिनाथ माळी, बालाजी अमाईन्सचे प्रसाद सांजेकर, बसवराज अंटद, मल्लिकार्जुन अरकाल, उमेश मामडयाल तसेच दामलेनगर व जगदंबानगर येथिल नागरीक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments