सापटणे ग्रामस्थांच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचा सापटणे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले माढा तालुक्यातील जनतेने मला फार मोठे सहकार्य केलेले आहे .तसेच मला निवडून आणण्यासाठी माढातालुक्यातील जनतेचा फार मोठा वाटा आहे माढा तालुक्यातील सापटणे हे गाव नेहमी मोहिते-पाटील कुटुंबाच्या पाठीमागे राहिले आहे.
या पुढे माढा तालुक्यातील प्रत्येक गावासाठी माझ्या परीने मी बहुमोल असे योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे .आपल्या गावातील काही अडीअडचणी असतील तर त्या मला सांगा मी त्या अडीअडचणी आपला माणूस म्हणून तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करेन." ते सापटणे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते
सापटणे ग्रामस्थांच्या वतीने सापटणे गावातील अडचणी सोडवण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सागर ढवळे यांनी मागणी केली असून कारखान्याचे केमिकल युक्त मळीचे घाण पाणी बंद करण्याची करा या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे सापडणे वाड्यामध्ये सोडलेले पाण्यामुळे विहिरी व बोर मध्ये त्याचे पाणी उतरल्याने येथील नागरिक यांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तातडीने लक्ष देऊन पाणी बंद करावे अशी मागणी केली आहे
तसेच सापटणे गावातील मजदिच्या कंपवाटची मागनी केली व व शेतकऱ्यांचे रस्त्याचे उसाचे प्रश्न मांडले अजून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
नुतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार सापटणे ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार सापटण्याचे माजी उपसरपंच दत्तात्रय ढवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माढा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे, शिवाजीराजे कांबळे, भारत नाना पाटील, बाळासाहेब पाटील, विनोद पाटील, टेंभुर्णी चे माजी उपसरपंच बलभीम आप्पा लोंढे, ॲड आकाश लोंढे, यांचेही सत्कार करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती ग्रुप सापटणे चे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब ढवळे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या वेळी सापटण्याचे, युवा नेते सागरराजे ढवळे, सुरजराजे ढवळे, दत्ता ढवळे -पाटील, बाळू काका पाटील ,विशाल कुबेर, बालाजी ढवळे, अमोल जगताप, स्वप्निल कुबेर, मिनीनाथ गोसावी, बापू गोसावी ,राहुल ढवळे ,समाधान थोरवे, रमजान भाई ,अकबर भाई, राणा ढवळे, सुनील बाबू गायकवाड ,महादेव गोसावी , सुरेश थोरात अधिक जण उपस्थित होते.

No comments:
Post a Comment