चव्हाणवाडी टें येथील मिस्कीन परिवाराने समाजापुढे ठेवला आदर्श
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-आईच्या रक्षा विसर्जन नदीमध्ये न करता त्यावर केले वृक्षारोपण; वृक्ष देतील आईची सावली चव्हाणवाडी टें तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अशोक बापू मिस्किन यांच्या आईचे कुंकूबाई विश्वनाथ मिस्किन यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धपकाळाने निधन 24 जून रोजी झाले होते त्यांच्या आई कुंकू बाई यांच्या पश्चात तिसऱ्या दिवशी जुन्या पारंपारिक प्रथेला फटा देत त्यांनी आईच्या रक्षा नदीमध्ये न टाकता शेतात फळांची विविध प्रकारची झाडे लावून रक्षा विसर्जन केले. आंबा, चिक्कू ,चिंच, नारळ अशा फळांची झाडे लावण्यात आली पारंपारिक परंपरेला छेद देत तिसऱ्या दिवशी रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जन न करता त्याद्वारे झाड लावण्याचा पायंडा मिस्किन कुटुंबियांनी पाडला.
आजही समाजात अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. या प्रथेला फाटा देत अशोक (बापू) मिस्कीन यांच्या आईच्या निधनानंतर जमिनीत रक्षा विसर्जन करून त्या जागेवर वृक्षारोपण केले.पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी मिस्किन कुटुंबीयांकडून आईची रक्षा व अस्थींचे वृक्षारोपण करत रक्षा विसर्जन करण्यात आले. मिस्कीन कुटुंबीयांनी जुन्या रुढी-परंपरेला फाटा देत पर्यावरणपूरक निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.
वृद्धापकाळाने कुंकूबाई मिस्कीन यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. मिस्किन परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांनी आईच्या अंत्यविधीनंतर रक्षा नदीत टाकल्या नाहीत. तर जमिनीत रक्षा विसर्जन करून त्याच जागी वृक्षारोपण केले. घरात दु:खमय वातावरण असतानादेखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरला आहे.
नदी किंवा विहिरीच्या पाण्यात मृत व्यक्तीचे अस्थी विसर्जन करण्याची प्रथा जवळपास सगळीकडे आहे. असे न करण्याबाबत शासनाकडून ही वारंवार सांगण्यात येते. परंतु अद्यापही लोकांकडून याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळते. परिणामी पाणी दूषित होऊन जलप्रदूषण होते. हीच बाब पर्यावरणआचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरते. हे टाळण्यासाठी ही जुनी प्रथा मोडीत काढून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे मिस्कीन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबानी केला.या शिवाय झाड आपल्याला ऑक्सिजन , फळे , फुले देतात...

No comments:
Post a Comment