खासदार निलेश लंके यांनी घेतली मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 22, 2024

खासदार निलेश लंके यांनी घेतली मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

 खासदार निलेश लंके यांनी घेतली मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट


नगर (कटूसत्य वृत्त):-नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हि भेट म्हणजे एक वर्तुळ पुर्ण करणारी भेट आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या माणसाला साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या थोर नेतृत्वाचा परिसस्पर्श झालेला आहे. हि नुसता स्पर्श नाही, तर चक्क डोक्यावर हात ठेवत 'हा मुलगा खूप मोठा होणार आहे' असं भावस्पर्शी वाक्य उच्चारत त्यावेळी जवळ कुशीत घेतलं होतं. मोलाचे चार शब्द सांगत झोकून देऊन काम करण्याचा सल्लाही दिलेला आहे. निलेश लंके त्यावेळी केवढे होते माहिताय, अंगावरची शाळेची कापडही तशीच असलेलं चौथीत शिकणारं एक पोर...!!  माझ्या डोक्यावर शिवसेनाप्रमुखांनी हात ठेवला, मला जवळ घेतलं, आणि माझ्याविषयी लोकांना उद्देशून ते म्हणाले, 'हा मुलगा खूप मोठा होणार आहे' ही भावना आणि त्यावेळी गावच्या मुख्य चौकात आपल्याला केंद्रित ठेऊन घडलेली ती घटना लहानग्या निलेश लंके यांच्या मनात इतकी ठसली इतकी ठसली, की शालेय वयातच या मुलाने संघटन कार्य सुरू केले आणि वय सुद्धा बसत नव्हतं तेव्हा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर पॅनल उभं करून निवडून आणलं, सरपंचही आपल्याच पॅनलमधल्या सदस्याला बनवलं होतं.समाजकारणी-राजकारणी आहेत. एका साध्या-सरळ आणि राजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या कुटंबातून आलेली व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात काय करु शकते याचं उदाहरण म्हणून लंके पुढे आले आहेत.हांगे गावातला लंके गुरुजींचा पिंट्या ते नेते लंके असा हा प्रवास आहे. या प्रवासाची सुरुवात झालीय ती खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने... साहेबांच्या जादूई शब्दांनी त्यांचा नेते होण्याचा प्रवास सुरु झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे साहेब अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने या प्रवासाचा नवा अध्याय रचला गेला. लंके यांची ही स्टोरी महाराष्ट्राच्या राजकीय परिवेशाच्या दृष्टीने बाळासाहेब ते पवारसाहेब अशी देखील आहे.म्हणूनच उद्धवजींसोबतची हि भेट खास आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुख असा सुरु झालेला हा प्रवास जायंट किलर खासदार येथपर्यंत येऊन ठेपलाय. या अर्थाने स्व बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादपर शब्द खरे झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages