मोडनिंब येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

मोडनिंब येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रक्तदान

 मोडनिंब येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रक्तदान

मोडनिंब(कटूसत्य वृत्त):-येथे निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वशांती परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान  शिबिरात २२१ दात्यांनी सहभाग नोंदविला. तर नेत्र तपासणी शिबिरात ९० जणांची तपासणी करण्यात आली. रक्तदान  सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रसंगी रुग्णांना रक्ताची गरज अधिक प्रमाणात भासते.हीच गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असल्याची माहिती निलेश पाटील यांनी दिली. सदर शिबिराचे आयोजन विश्वशांती अपार्टमेंट येथे करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी संजय पाटील घाटणेकर, भारत शिंदे, शिवाजी कांबळे, सयाजी पाटील, पोपट दोभाडा, अनिल मोरे, बालाजी पाटील, उत्तम मोरे, मोहन पाटील ,योगेश पाटील, बंडू घाडगे, सचिन जगताप, अमोल पाटील, गणेश नलवडे

डॉ.संतोष दळवी, डॉ. अमित व्यवहारे, कैलास तोडकरी, नितीन चव्हाण, शहाजी चव्हाण, भाऊ महाडिक, श्रीकांत पाटील, श्रीशैल मोरे, स्वप्नील मोरे, नंदू मोरे,अतुल गिड्डे,ज्ञानेश्वर सावंत, पांडुरंग देवर, विक्रम शिंदे, अमित शिंदे, औदुंबर पाटील, आकाश पाटील, रोहन पाटील,समीर शेख, सुनील लोंढे, रवीकांत जाधव, समीर गिड्डे, पप्पू कदम, अक्षय माळी, श्रीकांत घोलप, ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण जाधव, संतोष पाटील, संतोष सुतार, विशाल पाटील, सुरेश पाटील, बंडू खोत, अण्णा पाटील, शहाजी यादव, अमोल पाटील, बापू गोंडाळ, सागर जगताप, अमोल मोरे, मंगेश कुलकर्णी यासह विश्वशांती मित्र परिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages