धाब्यांवर दारु पिणे पडले महागात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

धाब्यांवर दारु पिणे पडले महागात

 धाब्यांवर दारु पिणे पडले महागात

2 होटेलचालकांसह 4 मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

मा. न्यायालयाने ठोठावला 65 हजारांचा दंड


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपी ग्राहकांना  पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावला.

सविस्तर वृत्त असे की, शनिवारी (ता. 15 जून) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यांवर छापा टाकला असता अंबादास सिद्राम म्हेत्रे वय 38 वर्षे हा दोन मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्के वय 30 वर्षे व मनोज श्रीहरी ढगे वय 38 वर्षे यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 68 व 84 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती ए.एस.बिराजदार यांचे समक्ष हजर केले असता धाबा मालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांचे पथकासह मंगळवारी (ता. 18 जून) दुपारच्या सुमारास रोपळे (बु.) गावच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक  सत्यवीर शाम बिहारी वय 40 वर्षे, मद्यपी ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड वय 33 वर्षे व पिंटू कुमार वय 35 वर्षे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत विभागाने 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या दोन बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती एस.ए.साळुंखे यांचे न्यायालयात हजर केले असता धाबाचालकाला पंचवीस हजार रुपये दंड व दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार व चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजाराची रक्कम मा. न्यायालयात जमा केली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, अशोक माळी, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत , वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. 

आवाहन

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील ढाबा / होटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या धाब्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून कायद्याचे उल्लंघन  करणा-यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील- नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages