“मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र जरांगेंना भेटायला, पाठिंबा द्यायला नको अशी प्रणिती शिंदेंची दुटप्पी भूमिका समाज कदापी खपवून घेणार नाही-अमोल शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 18, 2024

“मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र जरांगेंना भेटायला, पाठिंबा द्यायला नको अशी प्रणिती शिंदेंची दुटप्पी भूमिका समाज कदापी खपवून घेणार नाही-अमोल शिंदे

 “मराठ्यांची मतं पाहिजेत, मात्र जरांगेंना भेटायला, पाठिंबा द्यायला नको

 अशी प्रणिती शिंदेंची दुटप्पी भूमिका समाज कदापी 

खपवून घेणार नाही-अमोल शिंदे


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “मराठ्यांची मतं पाहिजेत. मात्र जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको. अशी खा.प्रणिती शिंदेंची दुटप्पी भूमिका समाज कदापी खपवून घेणार नाही” अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली. 

अमोल बापू शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील हे आपल्या जीवाची बाजी लावून अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले होते. त्यानंतर जरांगे-पाटील यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तरी ही खासदारकीची हावा डोक्यात गेलेल्या प्रणिती शिंदे ह्यांनी साधी जरांगे-पाटील यांची भेट घेण्याचे औदार्य दाखविले नाही. 

“प्रणिती शिंदे या मराठा समाज आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे खासदार झाल्या आहेत. त्यांनी कदापी डोक्यात हवा घालून घेऊ नये की काँग्रेसच्या लोकप्रियतेवर आपण खासदार झालो आहोत” अशी टीका अमोल शिंदे यांनी केली.

मराठ्यांची मते पाहिजेत, पण….

“जरांगे पाटलांसोबत बुके देऊन फोटो काढत तो व्हायरल करण्यासाठी किती आटापिटा केला ते सगळ्यांनी पाहिले. मात्र जरांगे पाटलांनी केलेल्या आमरण उपोषणाला तिथे जाऊन प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दिला नाही. मराठ्यांची मते पाहिजेत. मात्र जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको प्रणिती शिंदेंची ही भूमिका चुकीची आहे” असं अमोल शिंदे म्हणाले.

जरांगे पाटलांना का भेटल्या नाहीत?

“मराठा समाजाने देखील मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना वेळीच ओळखले पाहिजे. एकीकडे पंकजा मुंडे यां ओबीसी नेते लक्ष्मण हाकेना भेटतात, मग प्रणिती शिंदे जरांगे पाटलांना का भेटल्या नाहीत?” असा सवाल अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.

सोलापूरमधून प्रणिती शिंदे पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा पराभव केला. याआधी मागची दहावर्ष सोलापूरची जागा भाजपाकडे होती.

प्रणिती शिंदे यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली व विजय मिळवला. याआधी प्रणिती शिंदे आमदार होत्या. प्रणिती शिंदे या नेहमी चर्चेत असतात. सत्ताधाऱ्यांचा नेहमीच त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. आता शिवसेना शिंदे गटाने काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages