दिव्या पवारचे ऊर्जा सिलार पध्दतीचे भारतीय पेटंट मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

दिव्या पवारचे ऊर्जा सिलार पध्दतीचे भारतीय पेटंट मंजूर

 दिव्या पवारचे ऊर्जा सिलार पध्दतीचे भारतीय  पेटंट मंजूर


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील माजी विद्यार्थिनी कु. दिव्या चंद्रकांत पवार यांच्या ऊर्जा साठवणूक साठी उपयोगात येणाऱ्या नाविन्यपूर्ण रेड्यूसड ग्राफेन ऑक्साईड कांम्पोझिट विथ पॉलीअनॅलिन फिल्म बनविण्याच्या शिलार पद्धतीला भारतीय पेटंट मंजूर झाला आहे. या पेटंट साठी डॉ. डी .वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथील रिसर्च सेंटरचे डीन डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्या पवार ही सोलापूर विद्यापीठ येथून भौतिकशास्त्र विभागातून सुवर्णपदक विजेती आहे. सध्या ती डी वाय पाटील विद्यापीठात डॉक्टरेट पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. सदरच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील व संस्थेचे सर्व संचालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages