अनगरच्या पाटील विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

अनगरच्या पाटील विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

अनगरच्या पाटील विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान



अनगर (कटूसत्य वृत्त):- खरी बुद्धिमत्ता ही ग्रामीण भागातच असूनक कष्ट जिद्द व चिकाटी च्या बळावर ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा त्यांनी यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करावी आणि अधिकारी बनून देशाची सेवा करुन शाळेचे व गावाचे नाव  करावे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करेन असे आश्वासन लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा अनगरसिध्द शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी दिले
अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता दहावी, बारावी, एम एस टी सी इ टी या परीक्षेमध्ये गुण मिळवलेल्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार  व उपमुख्याध्यापक सिताराम बोराडे व पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर यांच्या सेवापुर्ती समारंभाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले.
निवृत्त शिक्षकांना संस्थेच्या वतीने मानपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयास नॅक कमिटी कडून बी ++  हे मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांचा तर नवनियुक्त उपमुख्याध्यापक महादेव चोपडे व पर्यवेक्षक माधव खरात यांचा बाळराजे पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शरद उंबरे, माजी मुख्याध्यापक विश्वजीत लटके, माजी पर्यवेक्षक शिवाजी मोटे, मुख्याध्यापक संजय डोंगरे, शशिकला कोष्टी, निवृत्त मुख्याध्यापक तुकाराम मोरे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages