शालेय विद्यार्थांना बस प्रवास पास आता शाळेत मिळणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

शालेय विद्यार्थांना बस प्रवास पास आता शाळेत मिळणार

 शालेय विद्यार्थांना बस प्रवास पास आता शाळेत मिळणार


 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शालेय विद्यार्थ्यांना बस प्रवास पास आता, शाळे मध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.यामुळे विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेचा तास बुडवून पास काढणेकरिता, बस स्थानकावर जावे लागत होते.तासनतास लाईन मध्ये उभा राहून,पास  मिळवावा लागत होता.सध्या असा व्याप संपला असून, विद्यार्थांना आता पास शाळेतच मिळणार आहे.        

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक , म.रा.मा.प. महामंडळ यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत, अकलूज आगराचे आगार व्यवस्थापक,  प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आगारातील पर्यवेक्षक कर्मचारी , अधिकारी यांनी तालुक्यातील शाळांना भेटी देत दिनांक २१ जून पासून प्रत्यक्ष शाळेत जाऊन पासचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. याला शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी, मोठ्या उत्साहात प्रतिसाद देत पास घेतले. याबाबत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी महामंडळाचे मनापासून आभार मानले.  
तसेच याव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, बस स्थानकावरील पास केंद्राची कामकाजाची वेळ देखील वाढविण्यात आली आहे. 
पूर्वी  पासची वेळ ही सकाळी ९:०० ते सायंकाळी ६ :००पर्यंत होती ती आता सकाळी ६:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या वाढीव वेळेचा लाभ घ्यावा. व जास्तीत जास्त पास काढून महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले आहे.  
विद्यार्थी पास थेट शाळेत यासाठी आगारातील सहाय्यक, कार्यशाळा अधीक्षक अनिरुद्ध सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक  केतन सोनवलकर,  आगार लेखाकार पंकज सावंत,  वाहतूक नियंत्रक  विजय रंदवे, राजू गोसावी, संजय पिसे, बळी पिसे,विजय लंगोटे,  वरिष्ठ लिपिक उदय दुपडे, लिपिक बानेवाड, महिला लिपिक केवाळे, वाघे, धनवे मॅडम तसेच आगारातील शिपाई  तांबोळी व विजय लोणकर यांनी तालुक्यातील शाळाना भेटी देत शाळेतच विद्यार्थिनीना पास देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages