मोटारसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 25, 2024

मोटारसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

 मोटारसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शहरातील जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटारसायकल चोर आकाश ऊर्फ अंड्या मोहन वडतिले (वय - २५ वर्षे) याचा गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख लक्षात घेऊन त्यास एपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द केले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी, शुक्रवारी २४ मे रोजी रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, शनिवारी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले. 

येथील भवानी पेठ मराठा वस्तीतील रहिवासी आकाश ऊर्फ अंड्या मोहन वडतिले हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन मोटार सायकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी करताना ईच्छापूर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, घराविषयी आगळीक, दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवेध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्याविरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावर दिसते.

आकाश ऊर्फ अंड्या वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२० मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि २०२१ मध्ये एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्याहून अधिक अनेक वेळा कारवाया होऊनही आकाश ऊर्फ अंड्या च्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, एमपीडीए अन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) मा. विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०१) अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोउपनि विशेंद्रसिंग बायस (गुन्हे शाखा), एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages