आपने दिले रिक्षाचालकांकरिता निवेदन..!
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-दिनांक 0७/०५/२०२४ रोजी झालेल्या अंमलबजावणी नुसार रिक्षा चालकास त्याच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणा करिता विलंब झाल्यास ५०/- रुपये प्रति दिन शुल्क द्यावे लागणार आहे.हा निर्णय रद्द करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन आम आदमी रिक्षाचालक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत शासनास दिले आहे.निवेदन देत असताना सदरील निर्णय व त्या संदर्भातील अंमलबजावणी ही रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक करणारी असून आम आदमी रिक्षा चालक संघटना या तरतुदीचा निषेध करते.अतिशय महागाईच्या या काळात रिक्षा चालकांना रिक्षा चालवून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे अतिशय कठीण बनले आहे. अश्यातच केंद्र शासनातर्फे असे निर्णय येणे योग्य नाही. तरी, आम आदमी रिक्षा चालक संघटने तर्फे शासनास नम्र विनंती आहे की हे निर्णय तात्काळ रद्द करावे.असे निवेदनात आपच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, तसेच आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी बिलाल शेख, असिफ शेख, उमर फारूक अलगी, अब्दुल समिअजर मनसूर, उमर फारूक जरतारगर आदी उपस्थित होते.

0 Comments