क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपण योजनेच्या सोलापूर शहर कार्यालयाचे थाटात उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिजामाता बहुउद्देशिय महिला मंडळ त शेटफळ ता पंढरपूर संचलित महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मान्यता प्राप्त " क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले " बालसंगोपन योजनेच्या सोलापूर शहर कार्यालयाचे उद्घाटन बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड . सुवर्णा कोकरे मॅडम व जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे परिवीक्षा अधिकारी दिपक धायगुडे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे पर्यावरणाचे महत्व ओळखून झाडाचे रोप देवून व त्याचे महत्व पटवून दिले या कामी इको नेचर क्लबचे मा मनोज देवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले . यावेळी प्रास्ताविकामध्ये संस्थेचे प्रमुख मार्ग दर्शक शत्रुघ्न कांबळे सरांनी सुधारित बालसंगोपन योजनेची माहिती देवून समाजातील योग्य लाभार्थ्यांना दरमहा २२५० परिपोषण अनुदान त्याचा उपयोग व पात्र लाभार्थी याबाबत सविस्तर माहीती देवून सदर संस्था भविष्यात एक आदर्श संस्था म्हणून नावारूपास आणण्याचा मानस बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड सुवर्णा कोकरे मॅडम यांनीही पर्यावरणाचे महत्व व संस्थेच्या कामकाजा विषय विस्तृत मार्गदर्शन करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाचे परिवीक्षा अधिकारी श्रीयुत . दिपक धायगुडे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या बालसंगोपन प्रकरणाचा आढावा घेवून योग्य व पात्र लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देणेत यावा पूर्वी NGO नसल्याने शासन लाभार्थ्या पर्यंत पोहचू शकत नव्हते आता मात्र NGO च्या माध्यमातून प्रस्तावाची योग्य छाननी होवून गरजू व पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा होईल NGO ने त्यादृष्टीने सखोल गृहचौकशी करूनच शासनास तशी शिफारस करावी असे आवाहन केले . यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार मस्के यांनीही आपले विचार मांडून योजना गरजू पर्यंत पोहोचवा असे आवाहन केले . निरिक्षण गृह सोलापूर मधिल संजय भिसेसर तसेच पंकज कस्तुरे उपअधिक्षक यांनीही शुभेच्छापर भाषण केले . आभार प्रदर्शन संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ शिल्पा गायगवळी मॅडम यांनी केले . या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ पूजा कांबळे श्रीमती ज्योती वाघमारे सहसचिव सौ सिपिका कांबळे कार्यकारी मंडळ सदस्या तसेच सेवा निवृत्त गटविकास अधिकारी श्री अकेले राष्ट्रवादी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अनिल बनसोडे सामाजिक कार्यकर्त्या सौ . जयश्रीताई नडगेरी सौ अनुराधाताई बनसोडे मनसेच्या विधानसभा अध्यक्ष श्रीमती जयश्री हिरेमठ प्रकाश कोळीसर . धेंडेसाहेब मेजर गायकवाड साहेब श्री लवटे साहेब व या भागातील नागरीक मोठया संखेने उपस्थित होते .
निरीक्षणगृहाच्या अधिक्षिका श्रीमती अश्विनी शिंगे मॅडम पाखर संकुलच्या श्रीमती कामिनी कांबळे मॅडम उपस्थित होत्या .


0 Comments