Ads

Ads Area

दूध उत्पादक शेतकऱ्याचे अनुदान तातडीने जमा करावे - प्रभाकर देशमुख

 दूध उत्पादक शेतकऱ्याचे अनुदान तातडीने जमा करावे - प्रभाकर देशमुख 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-दुध उत्पादक शेतकऱ्यांचे २६ रुपये प्रतिलिटर दुध घेतले जाते. मात्र सध्या जनावरांचा चारा आणि पशुखाद्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे २६ रुपयांचा भाव परवडत नाही. त्यामुळे शासनाने यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. त्यावर शासनाने प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून तातडीने अनुदान जमा करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. पशुखाद्याच्या महागाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र त्याला ही दोन तीन महिने लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दुधाचे अनुदान द्यावे, अन्यथा येत्या काही दिवसात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभा करण्यात येणार असून एक लिटरही दुध बाहेरच्या जिल्ह्यात आणि राज्यात जावू दिले जाणार नाही. याची दखल शासनाने घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close