Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरुर भाजप तालुका उपाध्यक्षपदी विजय घावटे यांची निवड

शिरुर भाजप तालुका उपाध्यक्षपदी विजय घावटे यांची निवड


 शिरूर (कटूसत्य वृत्त):-शिरूर तालुक्यामधून भाजप या पक्षाची धुरा योग्य रीतीने सांभाळण्यासाठी शिरूर येथील विजय भाऊसाहेब घावटे यांची भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली 

ही निवड शिरूर तालुका भाजप अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले या निवडी वेळेस दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते विजय घावटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडी वेळेस पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद उपस्थित होते ही निवड होताच शिरूर भाजप यांच्याकडून घावटे यांचे स्वागत करण्यात आले विशेषतः या निवडीबद्दल पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांनी विशेष असे अभिनंदन केले  घावटे यांनी बोलताना सांगितले की भाजप हा पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

Reactions

Post a Comment

0 Comments